अॅपलने आठवड्यात विकले १ कोटी आयफोन

six
अॅपलने आपला आयफोन ६ व ६ प्लस विक्रीसाठी उपलब्ध केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत १ कोटी फोनची विक्री झाली असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. जगभरातील १० देशांत एकाच वेळी आयफोन ६ व आयफोन ६ प्लस विक्रीसाठी उपलब्ध करून दिले गेले आहेत.

दोन वर्षांपूर्वी जेव्हा याच काळात कंपनीने आयफोन ५ लाँच केला होता तेव्हा पहिल्या दिवसांतच २० लाख प्री ऑर्डर नोंदविल्या गेल्या होत्या. आता आयफोन सहा साठीही पहिल्याच दिवशी ४० लाख प्री ऑर्डर आल्या होत्या यामुळे १ कोटी फोन विकले गेले असणे सहज शक्य असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गतवर्षी अॅपलने चीनसह ११ देशांत पहिल्या आठवड्यात आयफोन ५एस व आयफोन ५ सीची ९० लाख युनिट विकली होती. यंदा आयफोन सहा व आयफोन सहा प्लस चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला गेलेला नाही. तेथील कांही कायदे व नियमांमुळे हा फोन चीनमध्ये विक्रीसाठी येण्यास कांहीसा विलंब लागणार असल्याचेही सांगितले जात आहे.

1 thought on “अॅपलने आठवड्यात विकले १ कोटी आयफोन”

Leave a Comment