राष्ट्रपतींकडे डोंबिवलीच्या मातापुत्राने मागितले इच्छामरण

kalyan
मुंबई – पोलिस व राज्य सरकारकडे मुलाच्या सासरच्या मंडळींकडून होणा-या अन्याय, अत्याचाराविरोधात तक्रार करूनही न्याय मिळत नसल्यामुळे डोंबिवलीत राहणारे शारदा म्हात्रे व वग्रेश म्हात्रे या मातापुत्राने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे इच्छा मरणासाठी अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे.

म्हात्रे कुटुंबीय अंबरनाथ शीळ मार्गालगतच्या हेदुटणे गावात राहत असून वग्रेश याचा भारती हिच्याशी विवाह झाला आहे. मात्र भारतीच्या माहेरच्या मंडळींकडून वर्गेश व शारदा या मातापुत्राला त्रास दिला जात आहे. घरात घुसून मारहाण करणे, शिवीगाळ असे प्रकार सातत्याने होत आहेत.

भारती व तिच्या माहेरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून वर्गेश व त्याची आई शारदा हे दोघे काटई येथील विवाहित मुलगी छाया चौधरी हिच्या घरी राहण्यास गेले आहेत. गेल्या तीन वर्षापासून सतत होणा-या त्रासाला मायलेक त्रस्त झाले असून याविरोधात त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment