मित्र पक्षांकडूनही युतीला स्वबळाचा इशारा

mahayuti
मुंबई – “स्वाभिमानी’चे नेते सदाभाऊ खोत आणि “रासप’चे महादेव जानकर यांनी “महायुती तुटू नये अशी आमची इच्छा आहे. पण, आता वाट तरी किती पाहायची? सोमवारी सायंकाळपर्यंत तोडग्याची आम्हाला आशा आहे. तोपर्यंत निर्णय न झाल्यास स्वळावर निवडणुकांची तयारी करायची, असा आमचा इरादा असून तोडग्यासाठी शिवसेना-भाजपला शेवटचा २४ तासांचा अवधी दिल्याची माहिती दिली.

शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपांचे भांडण गेले आठ दिवस सुरू असल्यामुळे त्रस्थ झालेल्या दोन्ही घटक पक्षांनी निर्वाणीचा इशारा दिला. महायुती तुटल्यास स्वाभिमानी आणि रासप एकत्रित निवडणुका लढवू शकतात, असा खुलासाही जानकर यांनी केला.

युतीचे काही ठरत नसल्यामुळ आमच्यावर आमच्या संभाव्य उमेदवारांचा दबाव वाढत चालला आहे. मतदारसंघात जाऊन तयारी करावी लागणार आहे. जागावाटप लांबल्यास उमेदवारी अर्ज भरण्यास अवधी अत्यल्प मिळणार आहे. त्यामुळे आज तोडग्याची वाट पाहायची आणि गावी परतायचे, असा आम्ही निर्णय घेतल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

Leave a Comment