पारसकर यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा

sunil-paraskar
मुंबई – बडतर्फ आय पी एस अधिकारी सुनील पारसकर आणि त्यांचा भाऊ रवी पारसकर या दोघांविरोधात एका महिलेने चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मालवणी पोलिस ठाण्यात एक मॉडेलने यापूर्वीही बडतर्फ आय पी एस अधिकारी सुनील पारसकर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सुनील पारसकर यांच्या विरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

जीवे मारण्याची धमकी देवून आपल्याशी असभ्य भाषेत बोलल्याची तक्रारा पिडीत महिलेने पारसकर बंधुंविरोधात केली आहे. या दोघांविरोधात कलम ३४१, ५०९, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा चारकोप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

Leave a Comment