महायुती एकसंध ठेवण्यासाठी अमित शहांचा सेना प्रमुखांना फोन

amit-shah
मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना-भाजप युती टिकवण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

आतापर्यंत शिवसेना-भाजप आपापल्या प्रस्तावांवर ठाम असल्याने जागावाटपासंदर्भात झालेल्या सर्व बैठका, चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. शिवसेनेच्या ताठर भूमिकेसमोर झुकण्यास भाजपने नकार दिला आहे. शिवसेना १५१, भाजप ११९ आणि मित्रपक्ष १८ असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे.

या प्रस्तावानुसार शिवसेनेच्या जागा कमी होणार असल्या तरी, भाजपच्या जागा वाढणार नाहीत. त्यामुळे भाजपने हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत या मागणीवर भाजप ठाम आहे. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवार याद्या जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही एकमत न झाल्याने महायुती महाफुटीच्या दिशेने जात आहे.

Leave a Comment