प्रबळ महिला यादीत इंद्रा नूयी तिसर्‍या स्थानावर

pepsico
न्यूयॉर्क – व्यापार क्षेत्रातील प्रबळ महिलांच्या फोर्बस ने जाहीर केलेल्या २०१४ च्या यादीत भारतात जन्मलेल्या पेप्सीकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांनी तिसरे स्थान मिळविले आहे. फॉच्यूनच्या या यादीत समाविष्ट झालेल्या भारतीय वंशाच्या त्या एकमेव महिला आहेत. या यादीत अव्वल स्थानी आयबीएमच्या अध्यक्षा जिन्नी रोमेटी आहेत आणि सतत तीन वर्षे त्यांनी आपले स्थान कायम राखले आहे. दुसर्‍या क्रमांकावर जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बारा या आहेत.

फोर्बसच्या या प्रबळ महिला यादीतील निम्म्या महिला बड्या कंपन्यांच्या प्रमुखपदावर आहेत. या सर्वच महिलांनी व्यवसायाची पद्धत बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि त्यासाठी कठोर मेहनतही केली आहे. ५८ वर्षीय इंद्रा नूयी यांनी सातत्याने कंपनीची प्रगती केली असून अतिशय चांगला परर्फार्मन्स केला आहे.

Leave a Comment