
आयफोन ६ चे वेड कुठल्या टोकाला जाऊन पोहोचले आहे याचा उत्तम नमुना रियाधमध्ये पहायला मिळतो आहे. लग्न ठरवायचे म्हणजे देणीघेणी, मानपान याबाबत वधू आणि वर पक्ष अगदी हातघाईवर येतात. त्यात जेथे मुलीलाच हुंडा देऊन विवाह केला जातो तेथे वधुपक्ष वरचढ असतो तर वराला हुंडा दिला जातो तेथे वरपक्ष वरचढ असतो. लग्नात काय मागितले जाईल याचा अंदाज कुणीही करू शकत नाही.
आयफोन ६ द्या- बहिणीशी लग्न करा
रियाधमधील एका महाशयानी आपल्या बहिणीचे लग्न करण्यासाठी वरपक्षाने त्याला आयफोन ६ आणून दिला पाहिजे अशी अट ठेवली आहे. जो कुणी आयफोन ६ त्याला देईल त्याच्याशी बहिणीचा विवाह करून दिला जाईल असे त्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे त्याच्या या मागणीला केवळ घरातील लोकांचाच नव्हे तर खुद्द वधूचाही पाठिबा आहे. या अति टेक्नॉलॉची प्रेमापोटी त्याने आपली बहिण पणाला लावली आहे. त्यामुळे आता या कुटुंबाला आयफोन ६ सह घोड्यावरून येणार्या वराची प्रतीक्षा आहे.
