
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंह नेतृत्त्व करणार असल्याची घोषणा भारतीय अॅथलेटिक महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी केली आहे.
आशियाई स्पर्धेत ध्वजवाहक होणार सरदार सिंह
अनेक खेळाडूंना याबाबत विचारण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सामन्यांना सुरुवात होत असल्याने अनेक खेळाडूंनी पथकाचे नेतृत्त्व करण्यास नकार दिला. तसेच संचलनाच्या आधी म्हणजेच दुपारी १२ ते संध्याकाळी ४ असे चार तास ध्वजवाहक म्हणून स्टेडियमबाहेर उभे राहण्यास कुणीही तयार नव्हते.
अखेर सरदार सिंहने पुढाकार घेऊन भारतीय पथकाचे नेतृत्त्व कऱण्याची तयारी दर्शवल्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सरदार सिंह हातात तिरंगा उंचावून संचलन करताना दिसेल.
