सॅमसंग बंद करणार ऑनलाईन विक्री

samsng
मुंबई : सध्या ऑनलाईन मोबाईल्स विक्रीची चलती असून नवनवीन कंपन्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसत आहेत पण, याउलट सॅमसंगने मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या ऑफलाईन रिटेलर्सना टार्गेट आणि प्रमोट करण्याचा निर्णय सॅमसंगने घेतला असून कंपनीसाठी हा तोट्याचा निर्णयही ठरू शकतो. शाओमी आणि मोटरोलासारख्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाईन रिटेलर्सची मदत घेतली आहे. अशावेळी ऑनलाईन बाजाराकडे पाठ फिरवणे सॅमसंगला महागात पडू शकते.

सॅमसंगने आपल्या ज्या ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असून यात कंपनीचा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन गॅलक्सी अल्फा आणि नोट – ४ या मोबाईल्सचाही समावेश आहे.

Leave a Comment