बाबांच्या नेतृत्त्वाखाली दादा उपमुख्यमंत्री नसणार

cm
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा आघाडीचे सरकार बनल्यास मला उपमुख्यमंत्री व्हायची मला काडीचाही रस नसेल, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

आम्ही लोकांतून निवडून येतो. त्यामुळे लोकात जावे लागते तेव्हा त्यांच्या समस्या, अडचणी काय आहेत ते सांगतात. त्यानुसार काम करायला पाहिजे मात्र तसे होत नाही. याचा फटका निवडणुकीदरम्यान बसतो. लोकांना एखाद्या कामाचे आश्वासन दिले किंवा ते आपण करू शकत असलो तरी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्वाक्षरी करणे अपेक्षित असते. मात्र तसे होताना दिसत नाही. कोल्हापूर, खारघर, बारामती आदी ठिकाणी मुख्य शहरात सुरु असलेले टोल बंद करण्याचा माझा विचार होता. तशी तजवीज देखील केली होती. मात्र त्यावर मुख्यमंत्र्यांकडून काहीही झाले नाही. एका शहराचा टोल सरकारने भरला तर दुस-या शहरातील लोक त्यांचे अनुकरण करतील असे उत्तर देऊन वेळ मारली जाते. पण जनतेसमोर गेल्यावर त्यांचा रोष आम्हाला झेलावा लागतो. त्यामुळे मी तर ठरविले आहे की, आगामी काळात आघाडी सरकार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली बनल्यास आपल्या उपमुख्यमंत्रीपदच घ्यायला नको. जर लोकांचे कामच आपण करू शकणार नसू तर पद घेऊन करायचे असा सवाल उपस्थित करीत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Leave a Comment