शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले झाले कोणार्क सूर्य मंदिर

konark
नवी दिल्ली : ओरिसामधील सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर जगात स्थापत्य कलेसाठी ओळखले जाते. आता हे मंदिर शंभर वर्षानंतर सर्वसामान्यासाठी खुले करण्यात येणार असून हे मंदिर १९१३ मध्ये मुख्य मंडपातील दगड पडण्यास सुरुवात झाल्यामुळे बंद करण्यात आले होते. यानंतर या मंदिराच्या दुरूस्तीचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपवण्यात आले होते.

पूरीमधील कोणार्क सूर्य मंदिरचे सौदर्य सर्वसामान्यांना शंभर वर्षात पाहता आले नव्हते. २००८ मध्ये एएसआयने हे मंदिर सर्वसामान्यासाठी खुले करण्याचा विचार केला होता. हे मंदिर आठशे वर्षापूर्वीचे असल्यामुळे भिंतीला भेगा पडल्या असून मंदिराचे गर्भ गृह आधीच पडले होते. त्यातून दोन मूर्तीं मिळाल्या असून त्यांना वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

एएसआयच्या वास्तुकार प्रतिमा बोस आणि इटलीच्या पुरातत्ववीय प्रोफेसर कॉरॉसी यांनी रिपोर्टवरून सुरक्षित असल्याचे सांगितल्यानंतरच मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येईल. पण, मंदिराच्या मुख्य मंडपाचे कामपूर्ण होण्यासाठी अजून एक वर्षांचा कालावधी तरी लागेल. त्यानंतरच हे सर्वसामान्यासाठी खुले केले जाईल.