पाणी प्या आणि बाटली खा

bottle
संशोधकांना सतत कांहीतरी नवीन शोध लावल्याशिवाय चैन पडत नसावे. अर्थात अशा नवनवीन संशोधनांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक होते. कांही शोध मानवी इतिहास बदलण्यास समर्थ असतात तर कांही शोध दिशा बदलणारेही असतात. मानवी जीवनाला आलेली प्रचंड गती, चंगळवादाकडे वाढलेला ओढा आणि स्वास्थ्याबाबत अति जागरूकता यातून पाण्यासारखी आवश्यक गोष्ट बाटलीत बंद होऊन आली. मात्र या प्लॅस्टीक बाटल्यांमुळे प्रदूषणाचे ओझे वाढले.

संशोधकांनी प्रदूषण कमी करण्यास हातभार लागेल आणि शुद्ध पाणी पिता येईल असा नवा शोध लावला आहे. यात पाणी प्यायल्यानंतर ते ज्यात भरले आहे ती बाटली अथवा फुगा खाताही येणार आहे. समजा खायचा नसेल आणि फेकायचाच असेल तरीही कांही प्रॉब्लेम नाही. तो सहजी डिग्रेड होऊ शकणार आहे आणि त्याच्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही.

आहो नावाची ही फुगेवजा बाटली रॉयल कॉलेज ऑफ आर्टस आणि इंपेरियल कॉलेज लंडन यांच्या संशोधकांनी तयार केली असून त्याचे प्रमुख आहेत रोडिग्रो गार्सिया गोंगालेज. जिलेटिन पासून ही बाटली बनविली गेली आहे. केवळ पाणीच नाही तर कोणतेही द्रव पदार्थ त्यात भरता येणार आहेत असा संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment