
मुंबई – पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे. तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा. विजयाचा उन्माद चढू देऊ नका व हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल, असा सल्ला शिवसेनेने भाजपला ‘सामना’तून दिला आहे.
भाजपला सामनातून धडा… नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल!
कालच विविध राज्यातील ३३ विधानसभा आणि लोकसभेच्या ३ जागांचे निकाल जाहीर झाले. यात भाजपच्या झालेल्या पीछेहाटीच्या वृत्ताला शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’त पहिल्या पानावर प्रमुख स्थान देण्यात आले आहे.
तसेच सामनाच्या अग्रलेखातून हे निकाल म्हणजे उलटे असल्याचे तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी धडा असल्याचेही म्हटले आहे. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल! असा गर्भित इशाराही सामनाने भाजपला दिला आहे.
विधानसभा निवडणूकीत जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा. विजयाचा उन्माद चढू देऊ नका व हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखाने भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
