जिमनॅस्टीक प्रशिक्षकांवर अश्लील शेरेबाजीचा आरोप

gymnastic
नवी दिल्ली – आशियाई स्पर्धेचे जिम्नॅस्टीकचे प्रशिक्षक मनोज राणा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जिम्नॅस्ट चंदन पाठक यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आशियाई स्पर्धेची तयारी करणा-या एका महिला जिम्नॅस्टीक खेळाडूने केला असून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्पोटर्स कॉम्पलेक्समध्ये तयारी करताना मनोज राणा आणि चंदन पाठक यांनी आपल्याला अश्लील शेरेबाजी केली. हा प्रकार एकदा नव्हे अनेकदा घडल्याचा आरोप या महिला जिम्नॅस्टने केला आहे.

दक्षिण कोरियामध्ये होणा-या आशियाई स्पर्धेला दोन दिवस उरले असताना, एका महिला खेळाडूकडून प्रशिक्षकांवर हे आरोप झाल्याने भारतीय क्रीडा जगताला धक्का बसला आहे. वारंवार अश्लील शेरेबाजी करुन, या दोघांनी माझा आत्मसन्मान दुखावला आहे असे या महिला खेळाडूने म्हटले आहे.

ही महिला जिम्नॅस्ट खेळाडू उच्चशिक्षित असून पीएचडी पदवीधर आहे. प्रशिक्षण सुरु असताना ही घटना घडली. महिला खेळाडूच्या तक्रारीनंतर मनोज राण आणि चंदन पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment