शिवसेनेची भाजपला जादा १० जागा देण्याची तयारी

yuti
मुंबई – शिवसेनेनेही जागावाटपाच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या तणावातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असून नव्या प्रस्तावानुसार, शिवसेना मित्रपक्षाला १० वाढीव जागा देण्यास तयार असल्यामुळे भाजपच्या जागा ११९ वरून १२९ होतील. मात्र याच वाढीव जागांतून घटक पक्षांना हिस्सा देण्याची अट शिवसेनेने प्रस्तावात टाकली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा आज मुंबईत येत असून त्यांच्या उपस्थितीत हा तोडगा मान्य होण्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपने शिवसेनेला १३५ जागांचा प्रस्ताव दिला होता, तर शिवसेना १५५ पेक्षा कमी जागा न घेण्यावर ठाम होती. मात्र मंगळवारी पोटनिवडणुकांमध्ये भाजपचे िवमान खाली आल्याची संधी साधून शिवसेनेने २८८ पैकी १५९ जागांवर शिवसेना तर १२९ जागांवर भाजपने लढावे. तसेच या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १० जागा मित्रपक्षांना द्याव्यात असा नवा प्रस्ताव दिला.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनी आज राज्यभरातील जिल्हाप्रमुखांची तर शुक्रवारी संपर्कनेत्यांची बैठक शिवसेना भवनात बोलावली आहे. विधानसभा निवडणूकीतील जागावाटपावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडल्यामुळे आता सेनाही स्वबळावर लढण्याच्या दृष्टिने चाचपणी करत असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

Leave a Comment