शरीफ विरोधात खटला दाखल करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

nawaj-sharif
इस्लामाबाद : एका स्थानिक न्यायालयाने पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधात पाकिस्तानात सुरु असलेल्या आंदोलनात दोन आंदोलकांच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

या मागणीसाठी धर्मगुरु ताहिर उल कादरी यांची पाकिस्तान आवामी तहरिकने शरिफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा न्यायालयात धाव घेतली होती. कादरी यांच्या पक्षाने शरिफ यांच्याविरोधात आंदोलनादरम्यान पोलीस गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

Leave a Comment