चॅम्पियन्स लीगमधून प्रविण कुमार बाहेर

pravin-kumar
रायपूर : प्रविण कुमारला चॅम्पियन्स लीग टी-२० मधून लाहोर लायन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या पहिल्या मॅचच्या वेळी उजव्या खांद्याला गंभीर दुखापतीमुळे बाहेर करण्यात आले आहे.

शनिवारी मुंबई इंडियन्स आणि लाहोर लायन्स यांच्यात क्वॉलिफायर मॅचवेळी तो जखमी झाल्यामुळे त्याला डॉक्टरच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या रिपोर्टची वाट टीम बघत होती. आता त्याला झालेली दुखापत गंभीर असल्याने दिल्लीचा डावखुरा गोलंदाज पवन सुयाल हा प्रविण कुमारच्या जागी संपूर्ण चॅम्पियन्स लीग टूर्नामेंटमध्ये खेळणार आहे.

Leave a Comment