माओवादी नेता गडचिरोलीत जेरबंद

maobadi
गडचिरोली – गडचिरोली पोलिसांना माओवाद्यांच्या एका वरिष्ठ नेत्याला जेरबंद करण्यात यश मिळाल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

अटक करण्यात आलेल्या माओवाद्याचे नाव राजू उर्फ जेथुराम धुरवा(४१) असे असून तो छत्तीसगडमधील रादनंदगाव जिल्ह्यातील खाडेगावचा रहिवासी आहे. २००७ नंतर पहिल्यांदा गडचिरोली पोलिसांना माओवाद्यास पकडण्यात यश मिळाले आहे. मानपूर विभाग आणि औंधी लोकल ऑपरेशन पथकाचा तो सदस्य आहे.

जेथुराम धुरवा या माओवाद्याचा छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विविध गुन्ह्यांमध्ये हात होता. २००६ मध्ये पालमेडी येथे वाहन जाळणे, २००७ मधील सोरपूर हत्या, २००९ मध्ये पाडी हत्या, २०११ मध्ये कांदली हत्या. २०१२ मध्ये बुकमर्का हिल आणि मुंगेर चकमक, यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा हात होता. काही दिवसांपूर्वी माओवाद्यांच्या या पथकातील सहाय्यक कमांडरला ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले होते.

Leave a Comment