पुण्यातल्या चार अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

handcuff
पुणे – पुणे पोलिसांना मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून या आरोपींवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

पुणे गुन्हे शाखेच्या युनिट चारने ही कारवाई केली. या पाचही आरोपींकडून पोलिसांनी १३ देशी बनावटीची पिस्तुले, १ गावठी कट्टा आणि ६२ काडतुसे हस्तगत केली आहेत.

पोलिसांना खबऱ्यामार्फत दोघेजण पिस्तुल आणि काडतुसे विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून सहकाऱ्यांची नावे समजल्यावर आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली.

यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न याबरोबरच दंगलीचे तीन गुन्हे दाखल आहेत. रघुनाथ धावारे, समीर भालेराव, अनिल साळुंखे, सुनील परदेशी अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.

Leave a Comment