राष्ट्रवादीने दिला कॉंग्रेसला निर्वाणीचा इशारा

sunil-tatkare
कोल्हापूर- उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ चार दिवस बाकी असून जागावाटपाबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसला आघाडीबाबत २ दिवसांत आम्हाला निर्णय कळवावा अन्यथा त्यानंतर आम्ही स्वबळावर लढण्याची घोषणा करू असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

आजपासून कोल्हापूरातून निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात होत असून त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावेळी तटकरे बोलत होते. प्रचाराला सुरुवात झाली पण अजून जागावाटप झाले नाही. आघाडी होणार आहे की नाही याची माहिती राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वालाच नाही अशा परिस्थितीत प्रचाराची दिशा काय असेल असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष तटकरेंना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला.

Leave a Comment