पद्मश्री ढसाळांच्या घरावर जप्ती

namdev-dhasal
मुंबई – एका बँकेने घर जप्त करण्यासाठी पद्मश्री दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या मुंबईतील घरावर नोटीस पाठवली आहे.

१४ जानेवारी २०१४ मध्ये नामदेव ढसाळ यांचे कर्करोगाने निधन झाले. या दुख:तून अद्याप ढसाळ यांने कुटुंब सावरले नसताना, त्यांच्यावर आणखी एक संकट आले आहे. ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका यांनी या जप्तीपासून घर वाचावण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.

ढसाळ यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, ढसाळांच्या मृत्यूनतंर त्यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी बँकेला पत्र पाठवून आपण कर्ज फेडू शकत नसल्याचे सांगीतले. तसेच त्यांनी गाडी ताब्यात घेण्याचीही विनंती बँकेला केली.

मात्र, बँकेने गाडीचे लोन घरावर फिरवून जप्तीची नोटीस दिल्याचा आरोप मल्लिका ढसाळ यांनी केला आहे.

Leave a Comment