अजित पवारांनी लगावला तावडेंना टोला

ajit-pawar
कोल्हापूर – ऊठसूट जेलमध्ये घाला, ही काय मोगलाई आहे काय? असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना लगावला.

पवार म्हणाले की, भाजप नेते दरवेळी खोटे बोलतात. राज्य सरकारने त्यांच्याच सांगण्यावरून एसआयटी, माधवराव चितळे समिती नेमली. समितीचा अहवाल जाहीर केला. कोणताही घोटाळा झाला नाही हे स्पष्ट झाल्यानंतरही जर भाजपाचे नेते टीका करीत असतील, तर तो त्यांचा पोरकटपणा आहे.

निवडणुका आल्या की ते असे बोलतात. १९९५मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते दाऊद इब्राहिमला मुसक्या घालून भारतात आणणार असे सांगत होते. सत्ता मिळाली, पण दाऊदला काही आणला नाही. वेगळी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविणो हा त्यांचा स्थायीभाव आहे.

Leave a Comment