आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यातही पेटले दर युद्ध

airfare
भारतीय विमान कंपन्यांनी देशांतर्गत उड्डाणांसाठी अनेक सवलती जाहीर करून प्रवाशांना आपल्याकडे खेचून घेण्याची संधी साधली असतानाच आता या दरयुद्धात आंतरराष्ट्रीय विमानकंपन्याही उतरल्या आहेत. सिंगापूरची बजेट विमान कंपनी टायगर एअरने खास भारतीय प्रवाशांसाठी १० रूपयांत सिंगापूरला एकवेळचा प्रवास करण्याची योजना जाहीर केली आहे. अर्थात यात अन्य करांचा समावेश नाही. कंपनीला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही सवलत कंपनीने जाहीर केली आहे.

भारतीय हवाई क्षेत्रात आपला हिस्सा वाढविण्यास उत्सुक असलेल्या कतार एअरलाईन्सनेही भारतीय प्रवाशांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. त्यांनी जगभरातील १४० ठिकाणी जाण्यासाठी तिकीटात २५ टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. विमान कंपन्यांत पेटलेल्या या दरयुद्धाचा फायदा प्रवासी वर्गाला होणार आहे आणि ऐन दिवाळीत त्यांची खरी चंगळ होणार आहे.

Leave a Comment