बिलावल भुट्टो २०१८ ची निवडणूक लढविणार

bilawal
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा मुलगा व पाकिस्तान पिपल्स पार्टीचा अध्यक्ष बिलावल भुट्टो याने २०१८ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांत तो उतरणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. बिलावल म्हणाला की आमच्या कुटुंबाचा पारंपारिक गड असलेल्या लरकाना भागातील राटेडेरो मतदारसंघातून तो ही निवडणूक लढविणार आहे. हा बेनझीर भुट्टो यांचा मतदारसंघ आहे.

बिलावल पुढे म्हणाला की मी आईमुळेच राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. आता मी राजकारणात सक्रीय झालो आहे. २००७ डिसेंबरमध्ये आईची हत्या झाली त्यानंतर तिची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. बिलावलने यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून १० कोटी रूपयांचा चेकही दिला.

Leave a Comment