सोनिया, राहुल काँग्रेसचे स्टार प्रचारक

sonia
मुंबई – महाराष्ट्रात आक्टोबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट केली असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता कायम रहावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाला पक्षातर्फे चाळीस स्टार प्रचारक नेत्यांची यादी दिली जाणार आहे. त्यात सोनिया, राहुल यांच्या नावाचा समावेश आहे. स्वच्छ पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार देण्याचा आमचा निश्चय आहे तसेच कृषी, फळबागा, फुलशेती, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याचे कार्यक्रमही पक्षाने तयार केले आहेत. महाराष्ट्र उद्योगात मागे नाही त्यामुळेच अन्य राज्यातून महाराष्ट्रात येणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. तुलनेने महाराष्ट्राबाहेर कामधंद्यासाठी जाणार्‍यांचे प्रमाण अगदीच कमी असल्याचेही त्यानी सांगितले.

Leave a Comment