बड्या कंपन्यांसाठी इपीएफओचे कार्पोरेट ऑफिस

epfo
दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे बड्या कंपन्या आणि संस्थांना त्वरीत सेवा देता यावी यासाठी विशेष कार्पोरेट कार्यालये सुरू करणार असल्याची घोषणा केली गेली आहे. यात पहिले कार्यालय मुंबईतील ब्रांदा येथे सुरू केले जात असून त्याचे कामकाज १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बड्या कंपन्यांसाठीची ही ऑफिसेस पेपरलेस असतील आणि येथील सर्व कामकाज संगणकीय असेल. इपएफओची देशभरात १२० पेक्षा अधिक क्षेत्रीय कार्यालये आहेत मात्र ईपीएफओ ब्रँड व्हॅल्यू तयार करण्यासाठी कार्पोरेट कार्यालये सुरू केली जात आहेत. या कार्यालयांच्या उभारणीसाठी विशेष आर्थिक तरतूद केली गेली आहे. भविष्य निर्वाह निधीचे ५ कोटींपेक्षा अधिक सदस्य आहेत आणि त्यांची आर्थिक उलाढाल ६ लाख कोटींहून अधिक आहे.

Leave a Comment