विनायक मेटेंनी लगावला शिवसेनेला टोला

vinayak-mete
पुणे : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी महायुतीच्या घटक पक्षांनी जागावाटपाची चर्चा एकत्र बसून करावी, त्यासाठी वृत्तपत्राचा सहारा न घेता सामंजस्यची भूमिका ही मोठया पक्षांची असते, असा टोला शिवसेनेला लगावला आहे.

शिवसेनेने दै. सामनाच्या आज प्रसिध्द झालेल्या अग्रलेखाच्या माध्यमातून आधी राज्यात महायुतीची सत्ता आणा, मगच सत्तेत वाटा मागा, असा सल्ला महायुतीतील मित्रपक्षांना दिला आहे. शिवसंग्रामचे मेटे यांनी त्यापार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली असून आमचा पक्ष छोटा असल्याची आम्हाला जाणीव आहे. लहान पक्ष म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, आमचा अवमान करू नका, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. महायुतीत सर्वांचाच सन्मान राखला पाहीजे, त्यासाठी सर्वांना बरोबर घेतले पाहीजे. सामंजस्याची भूमिका ही लहान ऐवजी मोठया पक्षांनीच घ्यायची असते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment