
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने मुलींच्या शिक्षणासाठी झटणा-या मलाला युसुफझईवर प्राणघातक हल्ला करणा-या दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे.
‘मलाला’ हल्लाप्रकरणातील दहशतवादी जेरबंद
पाक लष्कराचे प्रवक्ते जनरल असीम बजवा यांनी ही माहिती दिली असून पोलीस आणि गुप्तचर संघटना यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली असून पाकिस्तानातील तालिबानी ‘शुरा’ या दहशतवादी संघटनेच्या दहा सदस्यांना अटक केली आहे. मलालावर दहशतवाद्यांनी ९ ऑक्टोबर २०१२ रोजी प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये तिच्या डोक्यात गोळया झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर मलालावर आधी पाकिस्तानात व नंतर ब्रिटनमध्ये उपचार करण्यात आले. सध्या मलाला ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण करीत असून, लहान मुलांच्या शिक्षणासाठी ती काम करीत आहे.
