ज्येष्ठ २५ आमदारांचे तिकीट कापणार काँग्रेस ?

congress
मुंबई – पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या २५ ज्येष्ठ आमदारांना विधानसभा निवडणुकीचे तिकिट देण्यास नकार दिला असल्यामुळे या आमदारांना डावलून काँग्रेस पक्ष तरुणांना संधी देणार असल्याचे समजते.

विधानसभा तिकीटासाठी सोनियां गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या २५ आमदारांनी अर्ज सादर केले होते. मात्र, यांचे अर्ज सोनिया गांधींनी फेटाळले आहेत. या आमदारांऐवजी २५ युवकांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या शिफारसी नुसारच तिकिटं देण्याचा निर्णय सोनियांनी घेतला आहे.

दरम्यान, उद्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी जागावाटपासाठी अधिकृत चर्चेला सुरुवात करणार आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल, ए.के अँटोनी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे या चर्चेत सहभागी होणार आहेत.

१६ सप्टेंबरनंतर काँग्रेसची निवडणूक समितीची बैठक होणार आहे. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार आहे. ८० उमेदवारांची नावे काँग्रेस पहिल्या यादीत जाहीर करणार आहे.

Leave a Comment