माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप

laxman-dhoble
मुंबई – एका ४२ च्या वर्षांच्या महिलेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप खुद पीडित महिलेने केला आहे.

ढोबळे यांच्या मुंबईतील नालंदा महाविद्यालयात ही महिला लिपीक म्हणून काम करत होती. त्यादरम्यान ढोबळे यांनी तीन वेळा बलात्कार केल्याचा आरोप हा महिलेने केला आहे. बोरिवली पोलिस ठाण्यात लक्ष्मण ढोबळे यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मणराव ढोबळे यांनी अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत तीन वेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. दरम्यान लक्ष्मणराव ढोबळे यांनी बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत.

Leave a Comment