पहिल्याच पत्रकार परिषदेत महापौरांची तारांबळ !

snehal-amberkar
मुंबई – मुंबईचा प्रथम नागरिक या पदावर विराजमान होणारी व्यक्ती हुशार आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेली हवी, त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल. मात्र नुकतीच महापौरपदाची सूत्रे हाती घेणा-या महापौर स्नेहल आंबेकर यांची पहिल्याच पत्रकार परिषदेत तारांबळ उडाली असून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत पत्रकारांनी अचानक केलेल्या प्रश्नांच्या भडिमारामुळे त्या पुरत्या गोंधळून गेल्या होत्या.

हिंदी आणि इंग्रजी भाषेची आंबेकर यांची मराठी भाषेव्यतिरिक्त बोंब असल्यामुळे पत्रकारांना सफाईदारपणे हाताळण्याचे तंत्र त्यांना अवगत नसल्याने इंग्रजी भाषेतून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्या असमर्थ ठरल्या. त्यात ‘हमारे घरमे पाहुणे आऐ थे’च्या राष्ट्रभाषा हिंदीच्या भानगडीत त्या पडल्याने त्यांची आणखीनच पंचाईत झाली.

मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आल्या. याप्रसंगी पत्रकारांशी त्यांना संवाद साधत आपल्या पुढील कारकीर्दीतील सात कलमी कार्यक्रम जाहीर करत महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment