मनसेच्या बाबतीत राज्य नेतृत्वच निर्णय घेतील

tariq-anwar
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तारीक अन्वर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीमधील जागावाटपाची प्रक्रिया येत्या दोन ते चार दिवसांत पूर्ण होणार असून मनसेची साथ घ्यायची का नाही, याचा निर्णय राज्य नेतृत्वच घेईल, असे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमात स्पष्ट केले.

अन्वर पुढे म्हणाले की महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून जागावाटप अद्याप झाले नसले, तरी येत्या दोन ते चार दिवसांतच जागावाटपाची प्रक्रिया पार पडेल. मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आधीच समझोता झाला आहे. याच फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्या पक्षालाच मुख्यमंत्रिपदाचा मान मिळेल. नाशिक महापालिकेत आघाडीने मनसेला पाठिंबा दिला असला, तरी राज्य स्तरावर कोणता निर्णय घ्यायचा याचा निर्णय झालेला नाही. मनसेची साथ घ्यायची का, याबाबतची भूमिका राज्य नेतृत्वच ठरवेल.

Leave a Comment