सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ऑस्कर दोषी

oscar
प्रिटोरिया – दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयाने दक्षिण आफ्रिकेचा अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला शुक्रवारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले असून यानुसार ऑस्करला दंड आणि १५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

न्यायमूर्ती थोकोजाइल मासिपा यांनी फिर्यादीने दाखल केलेल्या आरोपानुसार ऑस्करने हत्या केल्याचे सिद्ध होत नाही असे म्हटले आहे. याआधी गुरुवारी ऑस्करच्या हातून घडलेला गुन्हा पूर्वनियोजित हत्या नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

१४ फेब्रुवारी २०१३ रोजी ऑस्करने आपल्या घरात चोर घुसल्याचे समजून मैत्रीण रीवा स्टीनकँप हिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला होता.