विशेष न्यायालयाने बिर्ला प्रकरणी सीबीआयला सुनावले खडे बोल

coalgate
नवी दिल्ली – विशेष न्यायालयाने शुक्रवारी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाला (सीबीआय) कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या विरोधात दाखल केलेल्या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याची इतकी घाई कशाला करता? असा सवाल विचारला आहे.

कुमार मंगलम बिर्ला यांच्या विरोधात सीबीआयने कोळसा खाण वाटप घोटाळयाची चौकशी करताना प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल केला होता.

हे प्रकरण बंद करण्याची तुम्हाला इतकी घाई का आहे ? असा सवाल विशेष सीबीआय न्यायाधीश भारत पराशर यांनी सीबीआयच्या तपास अधिका-याला विचारला.

Leave a Comment