पठाण बंधूंनी स्थापन केली क्रिकेट अॅकॅडमी

irfan-pathan
मुंबई: सध्या टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी भारताचे ऑलराऊंडर्स युसूफ आणि इरफान पठाण मेहनत घेत आहेत. पण आता पठाण बंधूंनी मैदानाबाहेरही एका नव्या इनिंगची सुरूवात केली असून युसूफ आणि इरफानने क्रिकेट अॅकॅडमी ऑफ पठान्सची स्थापना केली आहे. याबाबतची घोषणा मुंबईत करण्यात आली.

पठाण बंधूंचा देशभरातील विविध शाळांमध्ये क्रिकेट ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचे ठरवले असून या ट्रेनिंग सेंटरमध्ये खेळाडूंचा आहार, शारिरीक आणि मानसिक कणखरता यावरही लक्ष दिले जाईल. तसेच प्रशिक्षकांना या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

वडोदरा येथे पुढील महिन्यात क्रिकेट अॅकॅडमी ऑफ पठान्सची सुरूवात होणार आहे. त्यानंतर देशभरात इतर शाळांमध्येही विस्तार करण्याचा पठाण बंधूंचा मानस आहे. मात्र इतक्यात क्रिकेटमधून निवृत्तीचा आपला विचार नसल्याचेही दोघांनी स्पष्ट केले.

Leave a Comment