आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार सानिया

sania-mirza
नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार असल्याचे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आज स्पष्ट केले. ही माहिती अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) दिली.

आघाडीच्या टेनिसपटूंनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताच्या टेनिस संघालाच आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती.

एशियाड स्पर्धा २० ते ३० सप्टेंबर दरम्यान होत आहे. या स्पर्धेनंतर सानिया २९ सप्टेंबरपासून सुरु होणा-या चायना ओपनमध्ये खेळणार आहे.

Leave a Comment