फेसबुकचे बाजारमूल्य २०० अब्ज डॉलर्सवर

facebook
न्यूयॉर्क- सोशल नेटवर्क साईट कंपनी फेसबुकचे बाजारमूल्य २०० अब्ज डॉलर्सवर पोहोचले असून ती जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत २२ व्या स्थानावर गेली आहे. येत्या काळात फेसबुकचे व्यवसाय भविष्य उज्ज्वलच असेल असे तज्ञांचे मत आहे.

फेसबुक फोटो शेअर करता येणारी इंस्टाग्राम आणि मोबाईल मेसेजिग सेवा व्हॉटस अॅप यांचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्णत्वास नेत आहे. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य अधिक वाढणार आहे असे तज्ञांचे मत आहे. फेसबुकने अफ्रिकेत त्यांचा युजर बेस १० कोटींवर गेल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. बड्या कंपन्यांच्या यादीत फेसबुकने टोयोटाला मागे टाकले असून फेसबुकच्या पुढे २१ व्या स्थानावर व्हेरिटोझ कम्युनिकेशन कंपनी आहे.

Leave a Comment