छोट्या व्यावसायिकांसाठी व्हॉटसअॅप ठरतेय वरदान

whats
व्हॉटस अॅपच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा भारतातील अनेक छोटे व्यावसायिक कुशलनेते करून घेत असून त्यामुळे त्यांच्या व्यंवसायात किमान २० टक्के वाढ झाली असल्याचे समजते. कपडे, खेळणी, ब्युटी पार्लर, सलून, बेकरी व्यावसायिक, किराणा दुकानदार अशा व्यवसायातील छोटे व्यावसायिक या अॅपच्या मदतीने आपल्या ग्राहकांना दुकानात नवीन काय याची घरपोच खबर देत आहेत आणि पर्यायाने मार्केटिंगसाठी होत असलेल्या खर्चात बचत होत आहे.

व्हॉटस अॅपचे भारतात सहा कोटींहून अधिक युजर आहेत. छोटे व्यापारी आपल्या दुकानात नवीन काय आले याची माहिती आपल्या नेहमीच्या ग्राहकांना त्वरीत देत आहेतच पण नवीन ग्राहकांपर्यंतही ही माहिती पोहोचवित आहेत. ग्राहकोपयोगी सेवांची माहितीही याच पद्धतीने ग्राहकांना दिली जात आहे. परिणामी ग्राहकांपर्यंत जवळजवळ रोज पोहोचणे त्यांना शक्य होते आहे आणि ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद येत आहे असे चॉकलेटचे दुकान चालविणार्‍या एका महिलेचे म्हणणे आहे. व्हॉटस्रअॅपच्या वापरामुळे जाहिरात न करताच किंवा ग्राहक दुकानात येण्याची वाट न पाहताही व्यवसाय वाढत असल्याचा अनुभव हे व्यापारी घेत आहेत.

Leave a Comment