मेरी कॉमला हवी प्रियंका चोप्रा ब्रँड अॅबेसिडर

marykomb
कोलकाता – भारताची ऑलिम्पिक पदक विजेती एकमेव महिला बॉक्सिंग क्विन मेरी कोम हिला प्रियंका चोप्रा ब्रँड अँबेसिडर म्हणून हवी आहे. प्रियंकाशी या बाबत लवकरच बोलणी करणार असल्याचे मेरी ने सांगितले असून मेरीचा हा प्रस्ताव प्रियंका स्वीकारेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. मेरीला देशभर बॉक्सिंग अॅकॅडमी उघडायच्या आहेत. तिची एक अॅकॅडमी सध्या इंफाळ मध्ये सुरू आहे. बॉक्सिगबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि मोठ्या प्रमाणावर युवा खेळाडूंनी त्याचे प्रशिक्षण घ्यावे अशी मेरीची मनीषा आहे.

गेल्याच आठवड्यात मेरी कोम चित्रपट रिलिज झाला आहे आणि त्याला देशातून चांगला प्रतिसादही मिळाला आहे.यात मेरीची भूमिका प्रियंकाने केली आहे. त्यामुळे मेरीला जशी प्रसिद्धी मिळाली तशीच बॉक्सिंगलाही मिळते आहे. मेरीने ऑलिंपिकसह सहा जागतिक चॅपियन स्पर्धात पदक मिळविण्याचा इतिहास रचला आहे आणि या खेळाकडे तरूण खेळाडूनी वळावे अशी तिची इच्छाही आहे. तिच्या इंफाळ येथील अॅकॅडमीत सध्या ३३ खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. मणीपूर सरकारने तिला ३ एकर जागा दिली आहे तर केंद्र सरकारने चार कोटी रूपयांची मदत दिली आहे. त्यातून या अॅकॅडमीत १०० खेळाडूंची राहण्याची तसेच प्रशिक्षणाची व्यवस्था केली जात आहे.

मेरीला देशभर अशा शाखा सुरू करायच्या आहेत. त्यासाठी प्रियंकाने ब्रँड अॅबेसिडर म्हणून काम केले समाजाच्या विविध थरात बॉक्सिंग बद्दल जागृती होईल आणि सर्व थरातील गुणवान खेळाडू या खेळाचे प्रशिक्षण घेऊ शकतील असे मेरीचे म्हणणे आहे.

Leave a Comment