अब्जाधीशांत लंडन न्यूयॉर्कला सेकंड होम घेण्याची क्रेझ

london
सिंगापूर – जगातील अतिधनवानांन आर्थिक केंद्रे असलेल्या लंडन, न्यूयार्क, सिंगापूर, हॉंगकाँग येथे सेकंड होम घेण्याची क्रेझ वाढती असल्याचे न्यू वल्ड वेल्थच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. युके, युरोप, चीन, भारत यात आघाडीवर असल्याचेही हा अहवाल सांगतो.

लंडनमध्ये २२३०० अब्जाधीशांनी सेकंड होम घेतली असून यामुळे सुटीच्या काळात येथे राहणार्‍या अब्जाधीशांची संख्या ३२ हजारांवर जाणार आहे. लंडन येथे सेकंड होम घेणार्‍यात युके, युरोप, चीन, भारत, रशिया आणि प.आशियातील अब्जाधीशांचा समावेश आहे. न्यूर्यार्कमध्ये १७४०० जणांनी सेकंड होम घेतली असून त्यात युके, युरोप, चीन, रशिया, ब्राझील आणि भारताचे अब्जाधीश आहेत. सिंगापूर सेकंड होम खरेदीत भारत पहिल्या स्थानावर असून त्यानंतर मलेशिया, फिलिपिन्स आणि व्हीएतनामी अब्जाधीशांचा नंबर आहे.

हाँगकाँग येथे १४८००, सिंगापूर ११२००, दुबई ८२०० सेकंड होम अब्जाधीशांनी खरेदी केली आहेत. भारतात अब्जाधीशांच्या संख्येत मुंबई पहिल्या स्थानावर आहे. मुंबईत २७०० अब्जाधीश राहतात.

Leave a Comment