
दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये पुरामुळे झालेली वाताहत पाहण्यासाठी त्या भागाचा दौरा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरला भरघोस मदतीचा हात पुढे करतानाच शेजारी पाक व्याप्त काश्मीरमध्येही पूर परिस्थिती गंभीर असल्याने पाक सरकारलाही मदत करण्याची तयारी दाखविली होती. मात्र पाक सरकारने ही मदत तातडीने नाकारली असून उलट भारतालाच कांही मदत हवी असल्यास करण्याची तयारी दाखविली आहे.
पाकने नाकारली मोदींची मदत
पाकव्याप्त काश्मीरमधील पूरपिडीत जनतेसाठी सहानुभूती आणि शेजारी राष्ट्र म्हणून भारत सरकार आवश्यक ती सर्व मदत देण्यास तयार असल्याचे मोदींनी जम्मूत जाहीर केल्यानंतर तसे अधिकृत पत्रही इस्लामाबादेतील विदेश मंत्रालयाला पाठविले गेले होते. रविवारी सायंकाळी हे पत्र पोहोचले मात्र त्यावर विदेश मंत्रालयाने तातडीने जबाब देताना पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही येथील पूरस्थितीची पाहणी केली असल्याचे आणि त्या भागात सुटका व मदतकार्य जोमाने सुरू असल्याचे कळविले आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्तांबद्दल आम्हालाही सहानभूती वाटत असून त्यांच्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पाक करू इच्छीतो असेही कळविले असल्याचे समजते.
