मनसेची ब्ल्यू प्रिंट घटस्थापनेला

raj-thakare
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ब्ल्यू प्रिंट येत्या घटस्थापनेला म्हणजे २५ सप्टेंबरला प्रकाशित केली जाणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

२५ सप्टेंबरला नवरात्र बसते आहे. या शुभमुहूर्तावर ब्ल्यू प्रिंट येत आहे. ही ब्ल्यू प्रिंट म्हणजे केवळ सादरीकरण नाही असे सांगून राज ठाकरे म्हणाले की त्यात डॉक्युमेंटरी, संशोधन, वेबसाईट आणि छोटी पुस्तिका यांचाही समावेश आहे. याशिवाय ब्ल्यू प्रिंट संबंधी एक अॅपही दिले जाणार आहे. शिवसेनेने त्यांचे व्हिजन डॉक्युमेंट यापूर्वीच प्रकाशित केले असले तरी ब्ल्यू प्रिंट ची घोषणा सर्वप्रथम मनसेने केली होती असेही राज ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Leave a Comment