सानियाने पटकवले मिश्र दुहेरीचे जेतेपद

sania
न्यूयॉर्क- अमेरिकन ओपनच्या मिश्र दुहेरीचे जेतेपद भारताच्या सानिया मिर्झा हिने ब्राझीलच्या ब्रुनो सोअर्सच्या साथीने मिळवले.

मिश्र दुहेरीचे जेतपद सानियाचे हे तिसरे ठरले असून अमेरिका आणि मॅक्सीकोच्या जोडीवर ६-१, २-६ आणि ११-९ असा सानिया आणि ब्रुनो यांनी विजय मिळवला. ग्रँडस्लॅमच्या मिश्र दुरेहीच्या अंतिम फेरीत खेळण्याची सानियाची ही पाचवी वेळ असली तरी ब्रुनो सोबतचा हा तिचा पहिलाच अंतिम सामना होता.

याआधी सानियाने २००९मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे आणि २०१२मध्ये फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवले आहे. यावर्षी तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुरेहीच्या अंतिम प्रवेश केला होता. मात्र तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Leave a Comment