मोदींना इस्लामचा शत्रू म्हणून प्रसिद्धी देण्याचा अल कायदाचा डाव

modi
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्लामचे शत्रू आणि मुस्लीम विरोधी अशी छबी बनविण्याचा प्रयत्न अल कायदा कडून केला जात आहे. अलकायदा संघटनेने भारतीय उपमहाद्विपात त्यांची शाखा सुरू केल्याची घोषणा नुकतीच केली आहे. ही घोषणा भारताने अतिशय गंभीरपणे घेतली पाहिजे असे मत दहशतवाद विषयाचे गाढे अभ्यासक आणि विश्लेषक ब्रुस रिडेल यांनी व्यक्त केले आहे. रिडेल अमेरिकेच्या सीआयए मध्ये विश्लेषक म्हणूक काम करत होते.

रिडेल यांच्या मते अल कायदाचा म्होरक्या जवाहिरीने भारतीय उपमहाद्विपात अल कायदाची शाखा सुरू केल्याचा व्हिडीओ जारी केला आहे. जवाहिरीचा हा व्हिडीओ भारताने गंभीर बाब म्हणून विचारात घेतला पाहिजे. पाकिस्तानात तळ असलेल्या अल कायदाला लष्करे तैय्यबाचे मोठे सहाय्य आहे. ही बाब भारतासाठी धोकादायक आहे. भारताच्या काश्मीर, गुजराथ आणि आसाम राज्यात अल कायदाने जिहादी शाखा सुरू केली आहे तसेच अफगाणिस्तानपासून ते म्यानमार पर्यंत शरीयत लागू केला आहे. भारताने ही बाब अतिशय गंभीरपणे घ्यायला हवी.