भारतासमोर इंग्‍लंडचे २९५ धावांचे आव्‍हान

jo-root
लीड्स – भारत विरुध्‍द इंग्‍लंड यांच्‍यातील पाचव्‍या एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर इंग्‍लंडने प्रथम फलंदाजी करीत भारतासमोर २९५ धावांचे लक्ष्‍य ठेवले आहे. ५० षटकाअखेर सात गड्यांच्‍या मोबदल्‍यात त्‍यांनी हे आव्‍हान भारताला दिले आहे.

तत्पूर्वी भारतीय संघामध्‍ये गोलंदाजीमध्‍ये बदल केला. धवल कुलकर्णी ऐवजी उमेश यादवला संधी देण्‍यात आली. तर यजमान इंग्‍लंडने संघामध्‍ये दोन बदल केले . हॅरी गर्नी आणि गॅरी बॅलेंसच्‍या जागी बेन स्‍टोक्‍स आणि जेम्‍स ट्रेडवॅल यांना अंतिम ११ मध्‍ये संधी देण्‍यात आली आहे.

मालिका गमावलेल्‍या इंग्‍लंडची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर हेल्‍स केवळ चार धावांवर परतला. मोइन अली ९ धावांवर परतला असताना रुटने डावाचे सुत्र आपल्‍या हाती घेतले आणि इंग्‍लंडचा डाव साकारला. त्‍याच्‍या शतकी धावसंख्‍येमुळेच इंग्‍लंडला आश्‍वासक धावसंख्‍या उभारता आली.

एलिस्‍टर कूक एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये सर्वांधिक धावा काढणारा इंग्‍डंलचा पहिला कर्णधार बनला असून त्‍याने एंड्यू स्‍ट्रॉसला मागे टाकत २३६७ धावा बनविल्‍या आहेत.

Leave a Comment