कोरे समोर आता म्हशींचे विघ्न

kokan-railway
रत्नागिरी – चाकरमान्यांसाठी यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाताना कोकण रेल्वेचा प्रवास प्रचंड मानसिक त्रास देणारा ठरला होता. पण परतीच्या प्रवासादरम्यान देखील चाकरमान्यांना तशाच अनुभवातून जावे लागत आहे.

शनिवारी सकाळी कणकवली-नांदगाव दरम्यान रेल्वे मार्गावर सहा म्हशी आडव्या आल्याने कोकणकन्या एक्स्प्रेस तब्बल दीड तास खोळंबली होती.

कोकण कन्या एक्सप्रेसने आडव्या आलेल्या या सहाही म्हशींना उडवले तर, एका म्हशीचे शिंग इंजिनच्या फॅनमध्ये अडकल्याने कोकण कन्या एक्सप्रेस दीड तास थांबून होती. यापूर्वी गणेशोत्सवाच्या आठवडाभर आधी विविध कारणांमुळे कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला होता.

Leave a Comment