
मुंबई : आज भाजपमध्ये माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित प्रवेश करणार असून नंदूरबारमधून माणिकराव गावित यांना पराभूत करुन हिना गावित खासदार झाल्यानंतर नंदूरबार मतदारसंघात आघाडीचा जोर कमी होत भाजपने वर्चस्व मिळवळे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेसाठी गावितांचा भाजपमध्ये प्रवेश महत्वाचा ठरणार आहे.
आज भाजपमध्ये प्रवेश करणार विजयकुमार गावित
लोकसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान खासदार हिना गावित यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे विजयकुमार गावितांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर गावितांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.
अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयकुमार गावित भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गावित यांच्यासह नाराज काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची फौज भाजपमध्ये दाखल होत आहे.
