नेयमार ठरला ब्राझीलच्या विजयाचा शिल्पकार

neymar
मियामी – सन लाईफ स्टेडियमवर झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात ब्राझीलने कोलंबियावर १-० ने विजय मिळवला. ब्राझीलचा स्टार कर्णधार नेयमारच्या एकमेव गोलच्या बळावर ब्राझीलने हा विजय साकारला.

सामन्याच्या ८३ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकचे नेयमारने शानदार गोलमध्ये रुपांतर केले. नेयमारने २५ मीटर अंतरावरुन हा गोल करत पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवून दिले.

नेयमारचा कर्णधार म्हणून तर डूंगा यांचा प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच सामना होता. विजयी सुरुवात झाल्याने दोघेही समाधानी आहेत. विश्वचषकात नेयमारचा प्रवास संपुष्टात आणणारा कोलंबियाचा कॅमिलो झुनिंगाही या सामन्यात खेळला. मैदानावर दोघांमध्ये कुठेही शत्रुत्व दिसले नाही. झुनिंगाने कोलंबियाचे कर्णधारपद भूषवले.

Leave a Comment