गणेशदर्शनासाठी उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक नाही

mega-block
मुंबई – मुंबईकरांना गणेशदर्शनासाठी असणारी रविवारची संधी लक्षात घेऊन रेल्वेने तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द केल्यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोमवारी अनंत चतुर्दशी असल्याने मुंबईकरांसह राज्यातून येणा-या गणेशभक्तांना रविवार हा एकच दिवस गणेशदर्शनासाठी मिळू शकतो. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे मेगाहाल होऊ नयेत यासाठी तीनही मार्गावर मेगाब्लाक रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रसासनाकडून सांगण्यात आले आहे.

विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या उपनगरांतील प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सोमवारी रात्री सीएसटी ते कल्याण या दरम्यान विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटीहून ही गाडी रात्री १.३० वाजता सुटणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. याआधी पश्चिम रेल्वेनेही ८ आणि ९ सप्टेंबर रोजी विशेष गाडय़ा सोडणार असल्याचे जाहीर केले. चर्चगेटहून विरारसाठी मध्यरात्री १.१५, १.५५, २.२५ ला आणि पहाटे ३.२० ला लोकल सोडण्यात येणार आहे.

Leave a Comment