
नांदेड – राज्यात होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीत भगवा फडकणार असून भ्रष्टाचारी आघाडी सरकारचे गणपतीसोबत विसर्जन करा, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नांदेडमधील एका सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. राज्याच्या विकासात गरिबांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
आघाडी सरकारचेही विसर्जन करा, उद्धव ठाकरेंचे आवाहन
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्राला लुटल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नामोनिशाण ठेवू नका, त्याचबरोबर ‘लव्ह जिहाद’ भारतात आणणार असाल तर शिवसैनिक हिंदुस्थानात ‘लव्ह हिंदुस्थान’ आणतील, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या दरम्यान शिवसैनिकांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
